शरद पवारांच्या मागे बसलेली मुलगी, कोण आहेत सोनिया दुहान?

Girl sitting behind Sharad Pawar Soniya Doohan, A yellow Dressed Girl WHO rescued NCP Mla ...शेकडो भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपल्या आमदारांना वाचवणारी मुलगी, 'लेडी जेम्स बाँड'ची कहाणी

P T

5/8/20231 min read

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला.

त्यानंतर अजित पवार वगळता पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवारांना राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

त्यानंतर तीन दिवसांनी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय मागे घेत पक्षाध्यक्षपदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

पवारांच्या मागे बसलेल्या एका महिलेने लक्ष वेधून घेतले… पिवळा शर्ट परिधान करून त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या.

पिवळा शर्ट घातलेली आणि शरद पवारांच्या मागे बसलेली ती बाई नक्की कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता. जाणून घेऊया तिच्याबद्दल...

सोनिया दूहान असे या महिलेचे नाव आहे. कोण आहे सोनिया दोहान?

सोनिया दूहान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. सध्या त्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सोनिया

फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. प्रजासत्ताक दिनी हरियाणाचे माजी क्रीडा मंत्री संदीप सिंह यांना विरोध करणाऱ्या नेत्या सोनिया दोहान होत्या. हरियाणातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. सत्ताधारी भाजप-जेजेपी युती सरकार महिलांना सुरक्षा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला

पहाटेचा शपथविधी व सोनिया दूहान

23 नोव्हेम्बर 2019 पहाटेचा शपथविधी झाला व ऑपरेशन लोटस सुरु झाले

गुरुग्राम ओबेरॉय हॉटेलमध्ये भाजपने 4 एनसीपी आमदारांचे अपहरण केले होते. त्यांच्याकडे पोलिस दलासह 150-200 भाजप कार्यकर्त्यांची सुरक्षा होती.

या आमदारांच्या सुटकेसाठी सोनिया दूहान यांनी योजना आखली. या आमदारांना या हॉटेलमधून बाहेर काढणे कठीण होते. त्यांनी सुमारे 200 सदस्यांची स्वतःची टीम बनवली.

त्या हॉटेलमध्ये त्यांचे स्वतःचे संपर्क होते. भाजप कार्यकर्त्यांचा team बदली होत असतांना तेव्हा त्या निर्णायक क्षणी त्यांनी हॉटेलच्या मागच्या दारातून 3 आमदारांची सुटका केली.

नरहरी झिरवाळ यापैकी एक आमदार दुर्दैवाने समोरच्या दारातून आले . भाजपचे कार्यकर्ते आणि सोनियांचे कार्यकर्ते ह्यांच्यात झटापट झाली. नरहरी झिरवाळ यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा नरहरी झिरवाळ ह्यांना बाहेर काढण्यात यश आले .

त्यांनी सर्व आमदारांना शरद पवारांच्या नवी दिल्ली (6, जनपथ) येथील घरी नेण्यात यश मिळवले. आणि ऑपरेशन यशस्वी झाले.